Monalisa Birthday: मोनालिसाने वाढदिवसाच्या दिवशी केलं असं की...! Video सोशल मीडियावर Viral

Monalisa Birthday Bash : भोजपुरी (Bhojpuri) अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) आज चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोनालिसाने आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर भोजपुरीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही (Hindi Cinema) आपली ओळख निर्माण केली आहे. मोनालिसा सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या मोनालिसाचा एक नवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्रीचा पती विक्रांत सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून (Instagram) अपलोड केला आहे. मोनालिसा 21 नोव्हेंबरला तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. हा व्हिडिओ मध्यरात्री वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Celebration) आहे, ज्यामध्ये मोनालिसा तिच्या पतीसोबत बेडरूममध्ये केक कापताना आणि त्याचे चुंबन घेताना दिसत आहे. (Monalisa did this on her birthday bash Video viral on social media nz)

मोनालिसाचा वाढदिवस सेलिब्रेशन

मोनालिसाच्या खास वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. विक्रांत सिंहने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड करून मोनालिसावरील प्रेम व्यक्त केले आहे. तिच्या पतीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये (Caption) लिहिले की, 'हॅपी बर्थडे माय वर्ल्ड, लव्ह यू.' 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता अपलोड केलेला हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. मोनालिसाचे मित्र आणि चाहते व्हिडिओवर कमेंट (Comment) करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Bash) देत आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

हे ही वाचा - बॉलिवूड स्टार्संनी दारूच्या नशेत ओलांडल्या मर्यादा, शाहरुख आणि सलमाननं तर...

 

विक्रांत- मोनालिसाची प्रेमकहाणी

जवळपास 10 वर्षे डेटिंग केल्यानंतर मोनालिसा आणि विक्रांत सिंग यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस सीझन 10 (Bigg Boss 10) च्या सेटवर त्यांनी लग्न केले. बिग बॉसच्या घरात त्यांच्या परफॉर्मन्सपेक्षा रोमान्सच्याच (Romance) जास्त चर्चा होत्या. लग्नानंतर मोनालिसाने भोजपुरी जगाचा निरोप घेतला. ही अभिनेत्री आता टीव्ही मालिका (TV) आणि वेब सीरिजमध्ये (Webseries) दिसत आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Monalisa did this on her birthday bash Video viral on social media nz
News Source: 
Home Title: 

Monalisa Birthday: मोनालिसाने वाढदिवसाच्या दिवशी केलं असं की...! Video सोशल मीडियावर Viral

 

Monalisa Birthday: मोनालिसाने वाढदिवसाच्या दिवशी केलं असं की...! Video सोशल मीडियावर Viral
Caption: 
Monalisa did this on her birthday bash Video viral on social media nz
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Monalisa Birthday: मोनालिसाने वाढदिवसाच्या दिवशी केलं असं की...! Video Viral
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, November 21, 2022 - 19:40
Request Count: 
1
Is Breaking News: 
No