मोदींचा दौरा

पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर असल्यामुळं त्यांच्यासाठी परदेशात खास व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन जातीनं लक्ष घालत आहेत.

खास मेजवानी

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये एका खास मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे.

खास टच

मेजवानीमध्ये भारतीय पदार्थांची जोड घेत त्यांना काहीसा परदेशी टच देत अफलातून पदार्थ तयार करण्यात आले आहेत.

फोटो व्हायरल

हे पदार्थ टेबलावर येण्याआधीच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

व्हाईट हाऊसमधील शेफ

व्हाईट हाऊसमधील या मेजवानीमध्ये शेफ निना कर्टीस आणि शेफ क्रिस कमफर्ड, पेस्ट्री शेउ सुसी मॉरिसन यांनी काही खास पदार्थांचा बेत आखला आहे.

मॅरिनेटेड मिलेट

पंतप्रधानांसाठी आखण्यात आलेल्या या मेजवानीमध्ये मॅरिनेटेड मिलेट आणि ग्रिल्ड कॉर्न कर्नेल सॅलड, कॉम्प्रेस्ड वॉटरमेलन आणि टँगी अवॉकाडो सॉस या पदार्थानं खाण्याची सुरुवात होईल.

मेन कोर्स

मेन कोर्समध्ये स्टफ्ट पोर्तोबेलो मश्रूम, क्रिमी सॅफ्रन इन्फ्यूज्ड रिझोटो असेल. त्याला सुमॅक रोस्टेड सी बास (मासा) आणि लेमन डील योगर्ट सॉसची जोड असा पदार्थ असेल.

गोडाचा पदार्थ

गोडाच्या पदार्थांविषयी सांगावं तर, जो बायडेन यांच्या व्हाईट हाऊसमध्ये येणाऱ्या मान्यवर पाहुण्यांसाठी गुलाब आणि वेलचीचा सौम्य सुगंध असणारा शॉर्टकेकही असणार आहे.

इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे पंतप्रधानांसाठी पूर्ण शाकाहारी पदार्थांची रेलचेल असली तरीही डायनिंग टेबलवर इतर मान्यवरांसाठी मासळीपासून तयार करण्यात आलेले पदार्थही असतील.

स्टेट डिनरमध्ये क्रिस्प्ड मिलेट केक, समर स्क्वाश असे पदार्थही डायनिंग टेबलवर असतील.

पदार्थांची रांग

थोडक्यात डिनर टेबलवर खाऊन संपणार नाहीत अशी पदार्थांची रांगच असणार आहे.

भारत आणि अमेरिकेची मैत्री

भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचा Toast Raise करण्यासाठी क्रिस्ती 2021, पटेल रेड ब्लेंड 2019 आणि डोमेन कार्नेरोस ब्रुट रोस अशा वाईनही असणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story