Personal Loan म्हणजे काय रे भाऊ, ते नेमकं कसं मिळतं? जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
सोप्या भाषेत सांगावं तर पर्सनल लोन हे एक अनसिक्योर्ड लोन आहे. जिथं काहीच गहाण ठेवण्याची गरज नसते. सहसा तुम्ही या कर्जाची परतफेड 1 ते 5 वर्षांमध्ये करु शकता.
मेडिकल इमरजन्सी, शिक्षणाचा खर्च, फिरण्याचा खर्च किंवा लग्नाचा खर्च या कारणांसाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता.
व्याजदरांबाबत सांगावं तर, खासगी बँकांद्वारे या कर्जांवर प्रति वर्ष 10.49% इतकं व्याज असतं. तर, काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका कमी व्याजदरा कर्ज देतात. यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम आणि मिळकत.
विविध प्रकारचे पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्ही ठराविक बँक किंवा NBFC च्या अटींची पूर्तता करत आहात तर, तुम्ही या कर्जांसाठी पात्र ठरता. तुम्ही बँक किंवा NBFC शाखेत जाऊन लोनसाठी अर्ज करू शकता.
ऑनलाईन पद्धतीनंही तुम्ही बँकेचं अॅप किंवा पोर्टलच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकता. यामध्ये प्रोसेसिंग फी, प्री आणि पार्ट पेमेंट, वेरिफिकेशन फी, डॉक्युमेंटेशन फी, लीगल चार्ज, ड्युप्लिकेट स्टेटमेंट यासाठीचं शुल्क आकारलं जातं.
तुम्हीही पर्सनल लोनच्या विचारात असाल तर क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून जास्त असेल याची काळजी घ्या. वेळोवेळी क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहा. विविध बँकांच्या कर्ज योजनांची तुलना करा.
कर्ज घेताना कायम क्रेडिट युटिलायजेशन रेशिओ 30 टक्क्यांहून कमी ठेवा. कमीत कमी वेळेत वारंवार कर्जासाठी अर्ज करू नका.
एक बाब लक्षात घ्या, की पर्सनल लोन घेतेवेळी बँक तुमचं वय, क्रेडिट स्कोअर, पगार, एकूण मिळकत, व्यवसायाचं सातत्य आणि नोकरीचा प्रकार हे निकष अंदाजात घेते.
सदरील गोष्टींची रितसर पूर्तता करून तुम्ही पर्सनल लोन मिळवून खासगी गरजांच्या पूर्ततेसाठी त्याचा वापर करू शकता.