मोदींनी जो बायडेन यांच्या पत्नीला दिलेला ग्रीन डायमंड आहे फारच खास

मोदींनी व्हाइट हाऊसमधील डिनरच्या आधी जिल बायडेन यांना हा हिरा भेट दिला

मोदी बायडेन भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी तसेच अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

खास डिनरचं आयोजन

व्हाइट हाऊसमध्ये बायडेन दांपत्याने पंतप्रधान मोदींसाठी खास डिनरचं आयोजन केलं होतं. यावेळेस दोन्ही नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली.

ग्रीन डायमंडची भेट

दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्याचं पहायला मिळालं. यावेळेस मोदींनीही एक खास भेट बायडेन यांच्या पत्नीला दिली. ही भेट होती ग्रीन डायमंड.

7.5 कॅरेटचा ग्रीन डायमंड भेट

मोदींनी जिल बायडेन यांना प्रयोगशाळेत तयार केलेला 7.5 कॅरेटचा ग्रीन डायमंड भेट म्हणून दिला.

पूर्णपणे पर्यावरणपूरक

हा ग्रीन डायमंडमध्ये जमीनीमधून काढलेल्या हिऱ्याचे रासायनिक गुणधर्म आणि ऑप्टिकल गुणांचा संगम असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा पूर्णपणे पर्यावरणपूरक हिरा आहे.

पूर्णपणे पर्यावरणपूरक

हा ग्रीन डायमंडमध्ये जमीनीमधून काढलेल्या हिऱ्याचे रासायनिक गुणधर्म आणि ऑप्टिकल गुणांचा संगम असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा पूर्णपणे पर्यावरणपूरक हिरा आहे.

यामुळेही हिरा खास

हा हिरा बनवण्यासाठी सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा हिरा तयार केला आहे. हा हिरा प्रती कॅरेट केवळ 0.028 ग्रॅम कार्बन उत्सर्जित करतो.

खास पेपर बॉॉक्समध्ये दिला हिरा

हा हिरा एका खास पेपर बॉक्समध्ये देण्यात आला होता. या पेपर बॉक्सला कार-ए-कलमदानी नावाने ओळखलं जातं.

4 C मध्ये सर्वोत्तम

कट, कलर, कॅरेट आणि क्लिअरिटी या चारही C बाबतीत हा हिरा सर्वोच्च प्रतिचा असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हा हिरा का देण्यात आला?

मोदींनी बायडेन यांच्या पत्नीला दिलेला हा हिरा भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमोहोत्सवी वर्षानिमित्ताने आणि आंतरराष्ट्रीय संबंध सुदृढ राहण्याच्या उद्देशाने दिलेली भेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच उद्देशाने हा हिरा भेट देण्यात आल्याचं समजतं.

किंमत किती?

जिल बायडेन यांना भेट देण्यात आलेल्या या हिऱ्याची नेमकी किंमत किती आहे याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

VIEW ALL

Read Next Story