Most Liveable Cities च्या यादीत मुंबईसहीत 5 भारतीय शहरांचा समावेश

जागातील Most Liveable Cities ची यादी पाहिली का? आपल्या मुंबईचाही आहे समावेश पण...

सर्वोत्तम शहरांची यादी

इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स यूनिटने (Economist Intelligence Unit) 2023 सालातील राहण्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांची यादी (Most Liveable Cities 2023 List) जाहीर केली आहे.

जगातील सर्वात लिव्हेबल शहर कोणतं?

ऑस्ट्रियाची राजधानी असलेलं वियना शहर हे राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलं आहे.

या आधारावर बनवली यादी

जगभरातील 173 शहरांची यादी जारी करण्यात आली आहे. आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्थैर्य, मूलभूत सुविधा यासारख्या गोष्टींचा विचार ही यादी बनवताना करण्यात आली आहे.

भारतामधील 5 शहरं

भारतामधील 5 शहर या यादीत आहेत. ती कोणती आहेत हे आपण पाहूयात पण त्याआधी या यादीतील अव्वल शहरांबद्दल जाणून घेऊयात.

टॉप 4 मध्ये कोण?

पहिल्या स्थानावरील वियना शहरानंतर दुसऱ्या स्थानी डेनमार्कमधील कोपेनहेगनचा समावेश या यादीत आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि सीडनी ही शहरं अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.

या देशातील सर्वाधिक 3 शहरं Top 10 मध्ये

टॉप 10 मध्ये कॅनडातील सर्वाधिक 3 शहरं आहेत. कॅनडामधील कॅलगरी, वेंकवर आणि टोरॅण्टो शहरांचा या यादीत समावेश आहे.

2 स्वित्झ शहरंही यादीत

स्वित्झर्लण्डमधील झुरिक या यादीत सहाव्या स्थानी आणि जिनेव्हा शहर 'मोस्ट लिव्हेबल सिटीं'च्या यादीमध्ये सातव्या स्थानी आहेत. जपानचं ओसाका शहर 10 व्या स्थानी आहे.

लंडनची मोठी घसरण

ब्रिटनची राजधानी लंडन आणि स्वीडनची राजधानी स्टॉकहोम अनुक्रमे 12 व्या आणि 22 व्या स्थानावरुन घसरुन 46 व्या आणि 43 व्या स्थानी घसरले आहेत.

मुंबईचं स्थान कितवं?

नवी दिल्ली आणि मुंबई ही शहरं या यादीमध्ये 60 व्या स्थानी आहेत.

भारतामधील ही 3 शहरंही यादीत

बंगळुरु, अहमदाबाद आणि चेन्नई ही शहरं या यादीमध्ये 60 व्या स्थानाच्या पुढे आणि 100 च्या आत आहे.

VIEW ALL

Read Next Story