Diwali 2023: 'या' दिवशी पाल दिसली तर उजळेल तुमचं नशीब

Pravin Dabholkar
Oct 25,2023


बहुतेकदा आपल्याकडे पाल दिसल्यावर नाक मुरडली जातात.


ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी पाल दिसणे शुभ मानले जाते.


तुम्हाला दिवाळीत पाल दिसली तर लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न आहे, असे मानले जाते.


व्यापार किंवा नोकरीत लाभ होणार असेल तर पाल दिसते, असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे.


ग्रहांची दिशा आणि दशा पाहून जिवनात काय घडणार हे कळते. यानुसार पाल दिसल्यास शुभ संकेत मिळतात.


दिवाळीच्या दिवशी पालीचा तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श झाला तर ते शुभ मानले जाते.


या दिवशी तर पाल दिसली तर तुमचं झोपलेलं नशीब जागणार असे समजा.


दिवाळीच्या दिवशी पाल दिसणे म्हणजे अडलेली कामे व्यवस्थित होणे असे म्हणतात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. )


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. )

VIEW ALL

Read Next Story