वजन कमी करण्याचा 9-1 फॉर्म्यूला; जीम आणि डाएटकडे ढुंकूनही पाहू नका

सध्याच्या काळात लठ्ठपणा एक मोठी समस्या असून, यासह अनेक व्याधीही उद्बवतात. यामुळे अनेकजण वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वजन कमी करण्याचा 9-1 फॉर्म्युला चर्चेत आहे.

हा 9-1 फॉर्म्युला नेमका काय आहे आणि त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घ्या...

9 चा अर्थ रोज 9 हजार पावलं चाला असा आहे. म्हणजेच तुम्हाला फिट राहायचं असेल तर रोज 9 हजार पावलं चालणं गरजेचं आहे.

9 हजार पावलं

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, एका व्यक्तीने रोज किमान 9 हजार पावलं चालावीत. यामुळे 250 ते 350 कॅलरी बर्न होतात. तुम्ही दिवसभरात कधीही चालू शकता.

8 ग्लास पाणी

9-1 नियमात 8 चा अर्थ 8 ग्लास पाणी आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी हायड्रेशन गरजेचं आहे. यामुळे अवयव जास्त चांगलं काम करतात आणि वजन कमी करण्यात मदत होईल.

7 तास झोप

9-1 नियमात 7 चा अर्थ 7 तास झोप आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी किमान 7 तासांची झोप हवी. तसंच 6 चा अर्थ मेडिटेशन आहे. तुम्ही किमान 6 मिनिटं ध्यान केलं पाहिजे.

5 प्रकारची फळं आणि भाज्या

9-1 नियमात 5 चा अर्थ रोज पाच प्रकारची फळं आणि भाज्या खा. यामुळे डायबेडिज, ब्लड प्रेशर आणि हार्टच्या आजारांचा धोका कमी होतो.

4 छोटे ब्रेक

9-1 नियमात 4 चा अर्थ तुम्ही कामादरम्यान किमान 4 छोटे ब्रेक घ्या. छोटे ब्रेक तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवतात. कॉफी-चहा ब्रेकदरम्यान तुम्ही बसल्या जागी स्ट्रेचिंग करु शकता. यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं.

3 हेल्दी फूड

9-1 नियमात 3 चा अर्थ 3 हेल्दी फूड आहे. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर टाळू नका, अन्य़था अवेळी आपण खात राहतो. या तिन्ही वेळा निरोगी आणि पोषणत्त्वाने भरपूर अन्न खावा.

झोपण्यात आणि डिनरमध्ये 2 तासांचं अंतर

9-1 मधील दुसरा नियम सांगतो की, तुमच्या झोपण्यात आणि डिनरमध्ये 2 तासांचं अंतर असायला हवं. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी रात्री लवकर जेवणं गरजेचं आहे.

रोज एक व्यायाम

1 चा अर्थ तुम्ही रोज किमान एक तरी व्यायाम केला पाहिजे. मग त्यात चालणं, धावणं किंवा इतर काहीही व्यायाम असू शकतो.

ही माहिती सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. तुम्ही कोणतंही औषध, उपचार घेण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधा.

VIEW ALL

Read Next Story