गव्हामध्ये ग्लूटन नावाचं तत्व फार मोठ्या प्रमाणात असतं. काही लोकांच्या प्रकृतीवर याचा वाईट परिणाम होतो.
वारंवार आणि जास्त प्रमाणात गहू खाल्ल्याने आतड्यांच्या आतील बाजूला सूज येते.
ग्लूटन अधिक प्रमाणात असलेलं धान्य नियमितपणे खाल्ल्यास आतड्यांना सूज येण्याबरोबरच जंत आणि बद्धकोष्टतेचा त्रास जाणवतो.
गव्हाच्या अनेक नव्या वाणांमध्ये ग्लूटनचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा फारच अधिक असल्याचं दिसून येतं.
भारतात ट्रिटिकम एस्टिवम नावाचा गव्हाचा वाण हा भारतात सर्वाधिक पिकवला जातो.
गव्हाऐवजी इतर धान्यांपासून तयार केलेले भाकरींचं सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायद्याचं ठरतं.
बाजरी, ज्वारी, नाचणीच्या भाकरीही फार पौष्टीक असतात. अनेकदा डाएटीशिएनही या मोठ्या आकाराच्या धान्याच्या पिठापासून तयार केलेल्या भाकरी खाण्याचा सल्ला देतात.
जाड धांन्यामध्ये आर्यन, झिंक, मॅग्नेशियम आणि फॉलिक अॅसीडसारखी पोषख तत्वे असतात.
अर्थात याचा अर्थ असा नाही की गव्हाची चपाती आहारातून पूर्णपणे काढून टाकली पाहिजे. ग्लूटनचा त्रास होत असेल तरच पर्यायाचा विचार करावा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)