'पवित्र रिश्ता' या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री आशा नेगीचा मोठा चाहतावर्ग आहे. ही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत होती. निमित्त होतं ते म्हणजे अभिनेता रित्विक धनजानीसोबतचं तिचं नातं.
आशा आणि रित्विकचं नातं फार काळ टीकू शकलं नाही आणि अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला.
आशा नेगीला संघर्ष अगदी लहानपणापासूनच चुकला नाही. खुद्द अभिनेत्रीनंच यासंदर्भातील खुलासा केला.
एका मुलाखतीत आशा म्हणाली होती, 'माझा जन्म बराच उशिरा झाला. मला एक मोठी बहिण, एक लहान भाऊ आणि पुन्हा एक बहिण. आपला जन्मच झाला नसता. पण, मोठ्या भावाचं निधन झालं आणि म्हणून माझा जन्म झाला'.
आशा नेगीच्या भावानं वयाच्या 11 व्या वर्षी निरोप घेतला होता.
घरातल्या सर्वांनाच मुलगा हवा होता, पण माझा जन्म झाला... यानंतर कोणालाच फारसा आनंद झाला नव्हता, असंही आशानं मुलाखतीदरम्यान सांगितलं.
आपल्या मोठ्या बहिणीविषयी सांगताना आशानं म्हटलं, माझा जन्म झाला तेव्हा मोठ्या बहिणीनं घरातून देवही बाहेर काढले होते. मला याचं फार वाईट वाटलेलं. आशानं सांगितलेली ही आठवण अनेकांच्याच मनात कालवाकालव करून गेली.