टोमॅटोच्या सेवनाने शरीरातील सिट्रीक अॅसिड आणि ऑक्सालिक अॅसिडमुळं पोटाली आम्लपित्तांची पातळी वाढते, ज्यामुळे अॅसिडिटी, जळजळ आणि तत्सम इतर समस्या सतावतात.
टोमॅटोमध्ये असणारा कॅरोटीनॉइड घटक रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक प्रभाव पाडू शकतो.
टोमॅटोच्या बिया सहजासहजी पचत नसून, त्यामुळं मूतखडा आणि त्यासारख्या व्याधी बळावू शकतात. इतकंच नव्हे, तर टोमॅटो खाल्ल्यानं शरीराला दुर्गंधीसुद्धा येते.
उपाशीपोटी टोमॅटो खाल्ल्यास त्यातील हिस्टामाईन आणि सोलनिनसारख्या घटकांनी शरीरातील कॅल्शियम पेशींच्या निर्मितीला वाव मिळतो आणि यामुळं सांध्यांना सूज चढते.
अनेकांना टोमॅटोच्या सेवनामुळं अॅलर्जीसम त्रासही सतावतो.
टोमॅटो उपाशीपोटी खाल्ल्यास त्यामुळं अनेक समस्या बळावू शकतात. त्यामुळं काळजी घ्या...
आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक पाऊल टाकताना ही गोष्ट अजिबात विसरू नका.