इडली किंवा डोसा सोबत नारळाची चटणी सर्वानाच आवडते. परंतु याचसोबत आपण गाजराची चटणी देखील सहज आणि चविष्ट बनवू शकता, जी लहान मुलांनाही आवडेल.
या चटणीसाठी लाल सुकी मिरची, हरभऱ्याची डाळ, उडिद डाळ, मीठ, हिंग, तेल, चिंच, किसलेले नारळ यांची आवश्यकता आहे.
एका कढईत थोडं तेल गरम करा आणि त्यात लाल सुकी मिरची, हरभऱ्याची डाळ आणि उडिद डाळ सोनेरी रंग येईपर्यंत परता.
हे मिश्रण थंड बाजूला ठेवा आणि किसलेले गाजर काही मिनिटे शिजेपर्यंत कढईत परतून घ्या.
सगळे मिश्रण थोडं थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सर मध्ये घालून बारिक करा.
आता त्यात किसलेले नारळ, चिंच, हिंग आणि आवश्यक प्रमाणात पाणी घालून चांगलं मिक्स करा.
गाजराची चटणी एका भांड्यात काढा आणि त्यावर कढीपत्ता, जिरे आणि मोहरीची फोडणी घाला.
तुमची गाजराची चटणी आता गरमागरम इडली किंवा डोसा सोबत सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.