आपली पर्सनालिटी सर्वांना आवडावी असं प्रत्येकाला वाटतं.
कोणत्याही माणसाला तुम्ही पहिल्यांदा भेटता तेव्हा त्याची पर्सनालिटी तुम्हाला कळते.
फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. त्यामुळे पहिल्या भेटीत आपल्याला जे वाटतं तसा आपण त्या व्यक्तीबद्दल विचार करतो.
कशा पर्सनालिटीची मुलं मुलींना आवडतात? याबद्दल जाणून घेऊया.
मुलांच्या बोलण्याचा स्तर, बोलण्याची पद्धत, शब्दफेक, समजदारी, संवेदनशिलता पाहिली जाते.
मुली मुलांची बॉडी लॅंग्वेज पाहतात. तो कोणत्या लोकांसोबत वेळ घालवतोय? त्याचे मित्र कसे आहेत? त्यावरुन त्याचे विचार कसे असतील हे तिला समजते.
तो स्वत:च्या कामाला किती प्राधान्य देतो, किती शिस्तप्रिय आहे, हे मुली पाहतात.