आपल्या जेवणात आपण कोथिंबीरीचा नियमित वापर करतो. जेवणाची चव वाढवण्याव्यतिरिक्त आरोग्यासाठी सुद्धा कोथिंबीरीचे अनेक फायदे आहेत.
हिवाळ्यात कोथिंबीरीची पाने लवकर कोमेजतात. अशा वेळी कोथिंबीर अधिक काळ ताजी ठेवण्यासाठी तुम्ही 'या' टिप्सचा वापर करु शकता.
कोथिंबीर अधिक काळ ताजी ठेवण्यासाठी तुम्ही एअर टाइट कंटेनरमध्ये कोथिंबीर ठेऊ शकता. जेणेकरुन कोथिंबीर बाहेरील हवेच्या संपर्कात न येता ताजी राहील.
कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी जीप लॉक कंटेनरचा सुद्धा वापर तुम्ही करु शकता.
कोथिंबीर जास्त काळापर्यंत ताजी राहण्यासाठी तिला मुळासकट पाण्यामध्ये ठेवा.
कोथिंबीरीची पाने अधिक काळ ताजी राहण्यासाठी कोथिंबीर कापून किंवा निवडून तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेऊ शकता.
कोथिंबीर स्वच्छ करताना खराब पाने आणि देठ काढणे गरजेचे आहे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)