प्रत्येक लहान मुलासाठी आपले आई-वडील हेच पहिले शिक्षक असतात. ते जे करतील तसं मुलेदेखील करतात.
मुलांना काही अडचण आल्यास ते सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांकडे जातात. पण बहुतांश मुलं आपल्या वडिलांपेक्षा आईशी जास्त कनेक्ट असतात.
सर्वसाधारणपणे मुली या वडिलांच्या जास्त जवळ असतात. तर मुलगे हे आईच्या जास्त जवळ असतात. यामागचे कारण समजून घेऊया.
आईकडून मुलांना भावनिक सपोर्ट मिळतो. दोघांमध्ये मजबूत भावनात्मक नातं तयार होतं. यामुळे दोघांचं नात जवळच असतं.
मुलं सर्वसाधारणपणे आईसमोर जास्त मनमोकळे करतात. आईसमोर अभिव्यक्त होतात.
आई आपल्या मुलांना आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण वाढवण्यास मदत करते. त्यामुळे मुलांना आई जास्त जवळची वाटते.
आईच्या तुलनेत वडील जास्त व्यस्त असतात. अशावेळी मुलं जास्त आईच्याजवळ असतात. आईसोबत जास्त वेळ घालवतात.
याव्यतिरिक्त अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे मुलांना आई जास्त जवळची वाटते.