घरातील अन्न आणि इतर खाण्यापिण्याच्या गोष्टी फ्रेश ठेवण्यासाठी लोक रेफ्रिजरेटरचा वापर करतात.
बरेच लोक संपूर्ण दिवस फ्रिज ऑन ठेवतात, तर काहीण दिवसातून अनेकवेळा फ्रिज बंद करतात. जेणेकरून विजेची बचत होईल आणि फ्रिज जास्त गरम होणार नाही.
जर तुम्हाला वाटत असेल की फ्रिज दिवसातून काही तास बंद ठेवल्यावर फ्रिज खराब होणार नाही आणि विजेची बचत होईल तर तुम्ही चुकीचे आहात.
फ्रिजमध्ये ऑटो कट ऑफ नावाचं फिचर असतं, ज्यामुळे गरज असल्यावर फ्रिज स्वतःच ऑफ होतो. अशात याला बंद करण्याची गरज नसते.
फ्रिजमध्ये असणार टेम्प्रेचर सेन्सर हे स्वतःच कुलिंग झाल्यावर पॉवर कट करत आणि ज्यामुळे फ्रिजवर ओव्हरलोड पडत नाही.
फ्रिज फक्त साफसफाई करताना किंवा रिपेअरिंग करताना बंद ठेवायला हवं. जर तुम्ही महिन्याभरासाठी बाहेर जात असाल तर फ्रिज बंद ठेऊ शकता.
फ्रिजमध्ये ऑटो कट झाल्यावर कॉम्प्रेसर बंद होतं. ज्यामुळे विजेची बचत होते आणि जेव्हा फ्रिजला कूलिंगची गरज पडते तेव्हा कॉम्प्रेसर पुन्हा सुरु होतो.
जर तुम्ही घरातून 1-2 दिवसांसाठी बाहेर जात असाल तर तुम्ही फ्रिज सुरु ठेऊन जाऊ शकता. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही.