'ताक पिणे' हा उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. परंतु ताक पिताना आपल्याला काहीवेळा प्रश्न पडतो की ताक कधी प्यावे?
न्यूट्रीशियस बाइट्सच्या संस्थापिका व वेट लॉस एक्स्पर्ट, पलकी चोप्रा सांगतात, "ताक हा प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत आहे. ताकाचे सेवन केल्याने, त्यातील प्रथिने तुमच्या शरीराला व स्नायूंना निरोगी बनवतात, त्याचप्रमाणे त्वचेची चमक राखण्यात व हाडे बळकट करण्यास मदत करतात.
ताक हे आपल्या पचनसंस्थ्येसाठी वरदान असल्याचे मानले जाते. ताकात असणारे चांगले बॅक्टेरिया व लॅक्टिक अॅसिड हे अन्न पचविण्यासाठी तसेच मेटाबॉलिझमचा वेग सुधारण्यास उपयुक्त ठरते.
ताकाचे सेवन केल्यामुळे जेवलेले अन्न पचनास मदत होते. यांचबरोबर ताकात असणाऱ्या लॅक्टिक अॅसिडमुळे आपले पोट नियमित साफ रहाते.
बऱ्याचदा बाहेरचे जंकफूड किंवा तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे आपल्याला अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात.
प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे. ताकामुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण होते.