सुट्ट्या हा शालेय विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय असतो.
शैक्षणिक वर्ष सुरु झालं की शाळेच्या डायरीत सर्वात आधी विद्यार्थ्यांकडून सुट्ट्या शोधल्या जातात.
शालेय विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षात किती सुट्ट्या आहेत तुम्हाला माहिती आहे का?
यामध्ये दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीचा समावेश आहे.
एवढेच नव्हे तर तब्बल 16 दिवसांची दिवाळी सुट्टी आहे.
शालेय सुट्ट्यांमध्ये शासन, विभागीय आयुक्त आणि मुख्याध्यापक निर्धारित सुट्ट्यांचा समावेश असतो.
उन्हाळी सुट्ट्या 2 मे ते 14 जून या काळात असतील.
28 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात दिवाळी सुट्ट्या असतील.
वर्षभरात एकूण 20 शासन निर्धारित तर विभागीय आयुक्त निर्धारित 3 सुट्ट्या विद्यार्थ्यांना मिळतील.
अशाप्रकारे वर्षभरात एकूण 86 सुट्ट्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.