Rare Disease: 24 तास कामोत्तेजनेने ग्रस्त आहे 'ही' तरुणी, 100 पैकी एकाला असतो हा आजार

Swapnil Ghangale
Apr 29,2024

सतत कामोत्तेजना वाटत असेल तर...

एखाद्या व्यक्तीला क्षणासाठी नाही तर कायमच कामोत्तेजना जाणवत असणारी व्यक्ती किती अडचणीत येऊ शकते, याचा तुम्ही विचार करु शकता.

ही तरुणी व्याधीने ग्रासली

मात्र 21 वर्षीय स्कार्लेट कॅटलीन वॉलेन नावाच्या तरुणीला खरोखरच कामोत्तजनेसंदर्भातील विचित्र व्याधीने ग्रासले आहे.

6 वर्षांची असताना पहिल्यांदा दिसली लक्षणं

स्कार्लेट अवघ्या 6 वर्षांची असताना तिला या व्याधीची लक्षणं दिसू लागली. तिला सतत पीन किंवा सुईने टोचल्यासारखे भास व्हायचे, असं एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

काय आहे या व्याधीचं नाव?

या व्याधीला PGAD किंवा पर्सिसेंट जेनायटल अरॉसल डिसॉर्डर असं म्हणतात. यामध्ये व्यक्तीच्या मनात सतत कामुक भावना निर्माण होत राहतात.

100 मध्ये एकाला असतो त्रास

100 पैकी एकीला PGAD किंवा पर्सिसेंट जेनायटल अरॉसल डिसॉर्डरचा त्रास असतो.

तिला मानसिक त्रास झाला

सतत वाटत राहणाऱ्या या विचित्र भावनेमुळे सार्केलटला तिच्या मैत्रीणींबरोबर खेळणंही कठीण झालं. तिला सामन्यपणे जगताही येत नव्हतं. याचा तिच्या बालमनावर फार मोठा परिणाम झाला.

हे सारं थांबवण्यासाठी...

कामोत्तेजना थांबवण्यासाठी स्कार्लेट गुप्तांगाजवळ व्हेपोरब मलम लावायची. काहीही करुन या सतत वाटत राहणाऱ्या भावना आणि त्रास थांबवण्याचा तिचा प्रयत्न होता.

हायस्कूलला गेल्यानंतर कळलं की...

स्कार्लेट हायस्कूलला गेल्यानंतर तिला लहानपणापासून होत असलेला हा विचित्र त्रास एक व्याधी असल्याचं लक्षात आलं.

स्कार्लेटला हा सुद्धा त्रास

स्कार्लेटला PGAD बरोबरच कग्ननिटल न्यूरोफ्रोफिलरेटीव्ह व्हॅस्टीब्युलोडायनियाचा त्रास असल्याचं स्पष्ट झालं. तिच्या गुप्तांगाजवळून जाणाऱ्या नसा अधिक संवेदनशील होत्या. त्या काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

शस्त्रक्रीया केली

या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी स्कार्लेटने तिच्या गुप्तांगाजवळच्या काही नसा शस्त्रक्रीयेच्या माध्यमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

त्रास कमी झाला

आता या शस्त्रक्रीयेनंतर स्कार्लेट पोस्ट सर्जरी थेरिपी घेत असून तुलनेनं तिचा त्रास कमी झाला असून यावर अधिक नियंत्रण मिळवण्याचा तिचा प्रयत्न आहे.

VIEW ALL

Read Next Story