धकाधकीच्या या जीवनशैलीमध्ये आज अनेकजण एकटे पडले आहेत. यामागे अनेक कारणं नाकारता येत नाही.
हाच एकटेपणा नकळत व्यक्तीच्या आरोग्यापासून मानसिकतेवरही परिणाम करताना दिसत आहे.
सीडीसीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार एकटेपणाची सवय असलेल्यांच्या जीवालाही धोका असतो.
दीर्घकाळ एकटं राहण्याची सवय असणाऱ्यांना सोशल एंग्जाइटीचा त्रास होतो. ही एक अशी स्थिती असते जिथं व्यक्तीला इतरांशी भेटीगाठी घेण्याची सवय राहत नाही.
एकटेपणाची सवय असणाऱ्यांना गंभीर आजारपणाचा धोका सतावतो. यामध्ये उच्च रक्तदाब, स्थुलता, हृदयविकाराचा धोका अशा समस्या सतावू शकतात.
एकटेपणामुळं मधुमेहाचा धोका वाढतो. शिवाय निद्रानाशाचीसुद्धा समस्या सतावते.
एकटेपणामुळं आत्मविश्वासाची कमतरताही भासते. यामुळं व्यक्तीच्या एकंदर Productivity वर परिणाम होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)