चमचमीत जेवणात काळ्या मिरीचा मसालेपदार्थ म्हणून वापर केला जातो. परंतु, तुम्हाला पांढऱ्या मिरीविषयी माहित आहे का?
काळ्या मिरी आणि पांढऱ्या मिरीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, दोघांमध्ये पोषकत्त्वाचे प्रमाण हे वेगवेगळे आहे.
काळी मिरी हे पायपर नायग्रमचे कच्चे फळ आहे. याला वाळवुन काळी मिरी तयार केली जाते.
याउलट, पांढरी मिरी हे पायपर नायग्रमचे पिकलेले फळ आहे आणि याला पाण्यात भिजत ठेवून पांढरी मिरी तयार केली जाते.
पांढऱ्या मिरीच्या तुलनेत काळी मिरी ही अधिक तीखट असते.
काळ्या मिरीतील पेपरिन हा घटक मेटाबॉलिजस वाढवण्यास मदत करतो. तसेच, पचनसंस्थेसंबंधी समस्यांना दूर ठेवण्यास मदत होते.
काळ्या मिरी हृदयाचे स्वास्थ्यासाठी फायदेशीर मानली जाते. तसेच, सर्दी आणि सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.
पांढऱ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
पांढऱ्या मिरीमुळे ब्लड प्रेशर तसेच थायरॉइड सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)