ट्रेनच्या थांबण्याचा सिग्नल असो किंवा अॅम्ब्युलन्स फायर ब्रिगेडची गाडी असो, या सगळ्यांवर आपण नेहमी लाल रंगच पाहतो.
परंतु, नेहमी आपत्कालीन धोक्याच्या खुणा लाल रंगातच का असतात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
खरंतर, भौतिकशास्त्रात प्रत्येक रंगाची वेवलेन्थ ही वेगवेगळी सांगितली गेली आहे. या सगळ्या रंगांमध्ये जांभळ्या रंगाची सर्वात कमी आणि लाल रंगाची सर्वाधिक वेवलेन्थ असते.
ज्या रंगाची वेवलेन्थ जास्त असते, तो रंग लांबून अगदी सहजपणे आणि स्पष्ट दिसतो.
लाल रंगाची वेवलेन्थ ही सर्वाधिक असल्याकारणाने लाल रंग हा लांबून स्पष्टपणे पाहता येतो.
याच कारणामुळे इतर रंगांच्या तुलनेत मानवी डोळ्यांना लाल रंग हा लगेच आणि स्पष्टपणे दिसतो. म्हणून आपत्कालीन परिस्थिती किंवा धोकादायक घटना या नेहमी लाल रंगानेच दर्शवल्या जातात.