शरीरातील हाड मजबूत राहावीत यासाठी लोकं विविध प्रकारच्या गोष्टी करतात.
काही लोकांचा असा समज असतो की उलटं चालल्याने हाडं मजबूत होतात. पण खरंच उलटं चालल्याने हाडं मजबूत होतात का? याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे.
असं म्हटलं जातं की उलटं चालल्याने सांध्यामधील हाडांवरचा दबाव कमी होतो आणि हाडांना गती मिळते ज्यामुळे ती मजबूत होतात. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांनी हा दावा फेटाळला आहे.
उलट चालल्याने हाडं मजबूत होतात यात कोणतेही तथ्य नाही आणि याला कोणताही शास्त्रीय आधार असं त्यांनी म्हटलंय. हाडं मजबूत करण्यासाठी उलटं चालण्याची गरज नाही असं तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दररोज जवळपास 30 मिनिटं व्यायाम केल्यास हाडांचं आरोग्य चांगलं राहतेचं पण तुमचं आरोग्य देखील सुधारतं.
वेगात चालणे, सायकल चालवणे, जॉगिंग करणे इत्यादी एक्टिविटी तुम्ही व्यायाम म्हणून करू शकता. असे कार्य करा ज्यामुळे हाडांची हालचाल होईल आणि शरीराला घाम येईल.
हाडं मजबूत होण्यासाठी पोटाची चरबी कमी करणे खूप महत्वाचे आहे. जास्त वजनामुळे हाडांवर दबाव पडतो, त्यामुळे हाडं कमजोर होतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)