वहीदा रहमानने अवघ्या 11 व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली होती.
त्यांनी देवानंद, राजकुमार आणि मनोज कुमार यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.
त्या इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत ज्यांना नाव कमवण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही.
त्यांनी चित्रपटात काम करण्याआधी लहान कपडे घालणार नाही अशा अटी दिग्दर्शकासमोर ठेवल्या होत्या.
त्यांनी 'सोलवा साल' या चित्रपटातील कपड्यांवरून दिग्दर्शक राज खोसला यांच्यासोबत भांडण केले होते.
एका शोमध्ये वहीदा रहमान यांनी स्वत: याचा खुलासा केला होता. त्यांनी कामासाठी कधीही धडपड केली नाही.