आलं प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात मिळणारा आणि औषधी गुणधर्म असलेला एक पदार्थ आहे. आयुर्वेदातसुद्धा आलं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे.
भारतीय लोक फक्त कडाक्याच्या थंडीतच नाही तर उन्हाळ्यात सुद्धा सकाळी उठल्यावर आल्याच्या चहाचा घोट घेणं पसंत करतात.
आल्यामध्ये शरीराची भूक नियंत्रित ठेवणारे आणि चरबी कमी करणारे काही गुणधर्म असतात. त्यामुळे आल्याचा चहा प्यायल्याने चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
आल्यात शरीरासाठी उपयुक्त असे प्रोटीन, कॅल्शियम, लोह तसेच सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स, फॉलिक अॅसिड असते, ज्यामुळे याचा चहा शरीराला पोषक तत्त्वे मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतो.
खास करुन हिवाळ्यात सर्दी-खोकल्यासारखे आजार सामान्य आजार उद्भवतात. या आजारांवर आल्याचा चहा हा रामबाण उपाय ठरु शकतो.
बरेचजण हे ब्लड प्रेशरने ग्रासलेले असतात. अशा व्यक्तींनी आल्याच्या चहाचे सेवन केले पाहिजे. नियमित आल्याचा चहा प्यापल्याने हायपरटेंशनची समस्या दूर होण्यास मदत होते.
बाहेरचं खाल्ल्याने किंवा जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशावेळी आल्याच्या चहाचे सेवन हे पचनसंस्थेशी संबंधित समस्यांना दूर ठेवण्यास फायदेशीर ठरते.
आल्याचा चहा प्यायल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. आल्यामधील क्रोमियम, मॅग्नेशियम आणि झींकमुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यास मदत होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)