वॉशिंग मशिनमध्ये चुकूनही 'या' 5 गोष्टी धुवू नका; कपड्यांसोबत मशिनही होईल खराब
वॉशिंग मशिन घेतली म्हणजे महिलांचा सर्वात मोठं काम सोप होऊन जातं.
अनेकांना वाटतं वॉशिंग मशिनमध्ये सर्व प्रकारचे कपडे धुतले जाऊ शकतात. पण तुम्ही चूक करत आहात.
तुमची ही चूक महागात पडू शकते. कारण केवळ कपडेच खराब होणार नाहीत, तर तुमची मशिनही खराब होते.
सिल्कच्या साड्या किंवा रेशमी कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाकत असाल तर तसे करणे टाळा.
लेदर जॅकेट, पँट, शूज, पर्स आणि अगदी त्यांचे बेल्ट आणि बॅग वॉशिंग मशिनमध्ये चुकूनही धुवू नका.
हिवाळ्यातील लोकरीचे उबदार कपडे देखील वॉशिंग मशिनमध्ये धुवू नयेत.
भरतकाम, मणी आणि स्टोन वर्कवाले कपडे वॉशिंग मशिनमध्ये चुकूनही धुवू नका.
तुमची रोज घालणारी ब्रा मशिनमध्ये धुत असाल तर ही सवय बदला. खरं तर, मशिन धुतल्यावर ब्राचे हुक खराब होण्याचा धोका असतो.