विक्की-रश्मीका सोबत 'छावा' चित्रपटात दिसणार 'हे' मराठी कलाकार

Pooja Pawar
Jan 23,2025


छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असल्लेया ऐतिहासिक चित्रपट 'छावा' चा ट्रेलर 22 जानेवारी रोजी लाँच झाला.


छावा या बिग बजेट आणि भव्यदिव्य चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि रश्मीका मंधाना हे मुख्य भूमिकेत आहेत.


विक्की-रश्मीका सोबत 'छावा' चित्रपटात काही मराठी कलाकार देखील महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

सुव्रत जोशी :

मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी हा 'छावा' चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

संतोष जुवेकर :

अभिनेता संतोष जुवेकरच्या 'छावा' चित्रपटातील लूकची झलक चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये दिसली.

आशिष पाथोडे :

अभिनेता आशिष पाथोडे हा सुद्धा छावा चित्रपटात झळकणार असल्याची माहिती मिळतेय.

शुभंकर एकबोटे :

मराठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर एकबोटे हा सुद्धा 'छावा' चित्रपटात दिसणार असल्याची माहिती मिळतेय.

VIEW ALL

Read Next Story