छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असल्लेया ऐतिहासिक चित्रपट 'छावा' चा ट्रेलर 22 जानेवारी रोजी लाँच झाला.
छावा या बिग बजेट आणि भव्यदिव्य चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि रश्मीका मंधाना हे मुख्य भूमिकेत आहेत.
विक्की-रश्मीका सोबत 'छावा' चित्रपटात काही मराठी कलाकार देखील महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी हा 'छावा' चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अभिनेता संतोष जुवेकरच्या 'छावा' चित्रपटातील लूकची झलक चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये दिसली.
अभिनेता आशिष पाथोडे हा सुद्धा छावा चित्रपटात झळकणार असल्याची माहिती मिळतेय.
मराठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर एकबोटे हा सुद्धा 'छावा' चित्रपटात दिसणार असल्याची माहिती मिळतेय.