मुगल हरममधील दासीला किती पगार होता?

नेहा चौधरी
Jan 10,2025


इतिहासकारक सांगतात की, मुघलांच्या हरममध्ये अत्यंत घृणास्पद कृत्य व्हायचे.


लढाईमध्ये हारलेल्या सम्राट किंवा राजांचे बेगम किंवा राण्यांना त्यासोबत इतर सुंदर स्त्रियांना मुघर हरममध्ये ठेवण्यात येत असे.


प्रत्येक राजाच्या हरममध्ये हजारो महिला असायच्या. इतिहासकार अबुल फलज यांनी लिहिलंय की, एकट्या अकबराच्या हरममध्ये 5000 पेक्षा जास्त महिला होत्या.


मुघल सम्राटांना हरममधील बातमी सांगण्यासाठी तिथे दासी असायची.


या दासी सम्राटाच्या बेगम आणि इतर पत्नींच्या कामा करता ठेवलेल्या असायच्या. त्यासाठी त्यांना मोठा पगार मिळायचा.


अकबराचे अर्थमंत्री तोडरमल यांनी प्रशासनाची चांगली आर्थिक आकडेवारी तयार केली होती. ज्यामध्ये या दासींच्या पगाराचीही माहिती मिळते.


या आकडेवारीनुसार, दासामधील पदेही अनुभव आणि जबाबदारीनुसार वाटली गेली आणि त्यानुसार त्यांचे पगार ठरले.


तोडरमलच्या माहितीनुसार, अकबराच्या काळात ज्येष्ठ दासींना दरमहा 1028 ते 1610 रुपये पगार दिला जात होता.


तसंच कनिष्ठ मोलकरणींनाही दरमहा पगार मिळत होता. त्यांना त्यांच्या जबाबदारीनुसार 51 रुपये, 40 रुपये पगार देण्यात आला.


जर तुम्हाला ही रक्कम फारच कमी वाटत असेल तर आम्ही तुम्हाला सांगूया की त्या काळानुसार ही रक्कम आज लाखो रुपयांच्या समतुल्य आहे.


अबुल फजलने स्वतः लिहिले आहे की 11.66 ग्रॅम सोने 10 रुपयांना विकत घेता येते. त्यानुसार 40 रुपये कमावणारी मोलकरीण दरमहा 4 तोळे सोने खरेदी करू शकते.


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हरमच्या दासी त्या बेगम किंवा उपपत्नींपेक्षा श्रीमंत होत्या ज्यांच्या काळजीसाठी त्यांना ठेवले होते.


खरं तर, बेगम आणि उपपत्नींना पॉकेटमनी मिळत नाही, उलट राजा त्यांना आनंदाने सोन्याची नाणी किंवा इतर भेटवस्तू देऊन बक्षीस देत असे, जे ते त्यांच्या आवडीनुसार खर्च करू शकत होते.


मुघल हरमच्या दासींना खूप अधिकार होते. सम्राटाच्या विश्वासू दासी हरेममध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिक्षा करू शकत होत्या आणि पुरुषांचा प्रवेश देखील रोखू शकत होत्या.

VIEW ALL

Read Next Story