शाहरूख खानच्या 'जवान' या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
परंतु यावेळी मात्र हा चित्रपट ट्विटरवर लिक झाला असून निर्मात्यांनी याविरूद्ध FIR दाखल केली आहे.
'फ्री प्रेस जर्नल'नं याविषयी एक वृत्त दिलं आहे ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'जवान' या चित्रपटाचे काही व्हिडीओ क्लिप्स या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
तेव्हा रेड चिलीज एंटरटेनमेंटनं माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कथित चोरीच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
10 ऑगस्ट रोजी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात निर्मात्यांनी FIR दाखल केली आहे. यावेळी पाच ट्विटर हॅडल्सवरून या चित्रपटाच्या काही क्लिप्स व्हायरल करण्यात आल्या आहेत.
या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, निर्मात्यांनी याची पुर्ण काळजी घेतली होती की शुटिंग दरम्यान कुठल्याही प्रकारे मोबाईल फोनचा वापर होता कामा नये.
परंतु काहींनी हे कृत्य केले असून आता या सर्व क्लिप्स काढून टाकण्याची विनंती करण्यात आली आहे.