टीम इंडिया सध्या वेस्टइंडिजविरुद्ध टी20 मालिका खेळतेय. शुभमन गिल आणि ईशान किशन भारतीय संघात आहेत.

शुभमन आणि ईशान एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांचे एकत्रित धमाल-मस्ती करतानाचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

सध्या सोशल मीडियावर दोघांचे असेच काही फोटो व्हायरल होत आहेत. दोघांनी विंडिजमध्ये प्रसिद्ध बार्बरकडून हेअरस्टाईल करुन घेतली.

दोघांच्या हेअर स्टाईलचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. वरुण असं या बार्बरचं नाव असून तो प्रसिद्ध हेअरस्टाईलिश आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही वरुणकडून हेअरस्टाईल करुन घेतली आहे. त्रिनिदादमधले अनेक सेलिब्रेटी वरुणकडे हेअरस्टाईल करुन घेतात.

वरुणची फी देखली प्रचंड महाग आहे. शुभमन गिल आणि ईशान किशनला हेअरस्टाईलसाठी तब्बल 900 डॉलर म्हणजे जवळपास 75 हजार रुपये मोजावे लागलेत.

शुभमन गिल आणि ईशन किशन हे टीम इंडियाचे स्टार आणि युवा खेळाडू आहेत. दोघं मस्ती करण्याचा एकही क्षण सोडत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story