IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स Arjun Tendulkar ला दाखवणार बाहेरचा रस्ता? 'या' टीमकडून खेळताना दिसण्याची शक्यता

अर्जुन तेंडुलकरने आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स टीमकडून पदार्पण केलं. यंदाच्या सिझनमध्ये त्याने 4 सामनेही खेळले.

दरम्यान या आयपीएलमध्ये त्याने काही खास कामगिरी केली नाही.

कदाचित त्याच्या कामगिरीमुळे आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स टीम त्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

अशातच आता मुंबईने अर्जुनला रिलीज केल्यानंतर तो कोणत्या टीममधून खेळणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जुन तेंडुलकर आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

दरम्यान राजस्थान रॉयल्स टीमने अर्जुन तेंडुलकर त्यांच्या टीममध्ये सामील होणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

त्यामुळे आता अर्जुन तेंडुलकर खरोखरच राजस्थान रॉयल्स टीममध्ये सामील होतो का हे पाहावं लागणार आहे.

VIEW ALL

Read Next Story