भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज शेफाली वर्मा हिने एका एअरलाईन्सवर गैरवर्तणूकीचा आरोप केला आहे. आपला अनुभव तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शेफाली वर्माच्या ट्विटवर अनेक कमेंट आल्या आहेत. पण लोकांनी तिलाच ट्रोल केलं आहे.
वास्तविक शेफाली वर्मा दिल्लीहन वाराणसीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली. पण विमानतळावर अवघ्या 25 मिनिटं आधी ती दाखल झाली
नियमानुसार वेळेच्या तीन तास आधी विमानतळावर दाखल व्हावं लागतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तिला प्रवेश दिला नाही. शेफालीने विनंती केल्यानंतरही तिला प्रवेश मिळाली नाही.
यावर शेफालीने कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. कर्मचाऱ्यांची आपल्याबरोबरची वर्तणूक वाईट असल्याचं तीने म्हटलंय. हा अनुभवन तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शेफालीने शनिवारी सकाळी 5.30 वाजता एअरलाईन्सविरोधात ट्विट केलं होतं. त्यानंतर बारा तासांनी ती काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचली.
भारतीय महिला क्रिकेट संघ एशियन्स गेन्समध्ये खेळताना दिसणार आहे. शेफाली वर्मा या स्पर्धेत टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणार आहे.