19 वर्षांचा असताना दिग्दर्शकानं सर्वांसमोर मारली चापट, आज देशातील सर्वात महागडा अभिनेता

भारताचा सगळ्यात महागडा अभिनेता

थलपती विजय हा सध्या भारतातील सगळ्यात महागडा अभिनेता ठरल्याचे म्हटले जात आहे.

'लियो'साठी घेतले इतके मानधन

थलपती विजयनं लियो या चित्रपटासाठी जवळपास 200 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

कधी 500 रुपयांसाठी केले काम

विजय 10 वर्षांचा असताना चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम करत होता. तेव्हा त्याला त्याचे 500 रुपये मिळायचे. याचा खुलासा त्याचे वडील एसए चंद्रशेखर यांनी 2010 मध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

19 वर्षी मिळाला लीड रोल

थलपती विजयला वयाच्या 19 वर्षी महत्त्वाच्या भूमिकेत पहिला चित्रपट मिळाला असून त्याचे नाव 'Naalaiya Theerupu' असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक थलपतीचे वडील चंद्रशेखर यांनी केले होते.

दुसऱ्या चित्रपटात दिग्दर्शकानं कानशिलात लगावली

त्यानंतर थलपती विजय हा 'Sendhoorapandi' या चित्रपटात दिसला. या चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक एसए चंद्रशेखर यांनी वियला सेटवर सगळ्यांसमोर कानशिलात लगावली. याचा खुलासा अभिनेता पोन्नम्बलमनं केला.

दिग्दर्शकानं का लगावली होती कानशिलात?

पोन्नाम्बलम यांनी खुलासा केला की 'एस ए चंद्रशेखर यांना त्यांच्या मुलांना सुपरस्टार बनवायचं होतं. त्यामुळेच त्यांनी त्या विचारात असताना विजयला सगळ्यांसमोर कानशिलात लगावली होती.'

लियोनं केली इतकी कमाई

विजयच्या लियोनं 7 दिवसात वर्ल्ड बॉक्स ऑफिसवर 470 कोटी कमाई केल्याचे म्हटले जाते. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story