बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला पाचपैकी तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

Oct 26,2023


पाकिस्तानच्या खराब कामगिरी ठपका कर्णधार बाबर आझमवर ठेवला जातोय. पाकच्या दिग्गज क्रिकेटर्सनेही बाबर आझमवर टीका केली आहे.


अशातच बाबर आझमची पाकिस्तानच्या कर्णधारपदावरुन उचलबांगली करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी केलं आहे.


पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला नाही तर बाबर आझमची उचलबांगडी होऊ शकते असे संकेत पीसीबीने दिले आहेत.


पीसीबीने आपल्या निवेदनात म्हटलंय, हार-जीत हा खेळाचा भाग आहे, मुख्य निवडकर्ते इंजमाम उल हक यांना नवी टीम बनवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे


विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर क्रिकेट बोर्ड पाकिस्तानच्या क्रिकेटच्या हिताचा निर्णय घेईल असंही यात सांगण्यात आलं आहे.


विश्वचषक स्पर्धेत 27 ऑक्टोबरला पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास पाकिस्तानच्या सेमीफायलमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात येतील

VIEW ALL

Read Next Story