15 दिवस रोज सकाळी रिकाम्यापोटी खा ओले अंजीर; शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल

अंजीर एक स्वादिष्ट ड्राय फ्रूट आहे, जे आपल्या असंख्य पोषणतत्वांसाठी ओळखले जाते.

जर तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी ओले अंजीर खाल्ले तर अनेक आजारांपासून वाचू शकता. याशिवाय वजन कमी करण्यातही मदत करतात.

खनिजं

अंजीरमध्ये विटॅमिन ए, सी, पोटॅशिअम, कॅल्शिअम, सोडॅशिअम, मॅग्निशिअम, फॉस्फरस, मँगनीज, जिंक असे खनिज असतात जे शरिरासाठी गरजेचे असतात.

पोटाचं आरोग्य

अंजीर पोटासाठी फार फायदेशीर आहे. हाय फायबर असल्याने ते पोटाला डिटॉक्स करतं. यामध्ये प्रीबायोटिक गुणही असतात जे पोटातील बॅक्टेरियाला पोषण देतात. यामुळे पचनयंत्रणा सुधारते आणि पोटाचं आरोग्यही चांगलं राहतं.

पेशींची सुरक्षा

अंजीरमध्ये पॉलीफेनॉल्स नावाचं सुरक्षित कंपाऊंड असतं. यामधील एंटीऑक्सिडेंट पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवतात.

खनिजांचं स्त्रोत

अंजीर हे कॅल्शिअम, मॅग्निशिअम, फॉस्फरस अशा खनिजांचं स्त्रोत आहे. यामुळे त्यांना हाडांसाठी चांगलं मानलं जातं. अंजीरमध्ये इतर फळांच्या तुलनेत 3.2 पट अधिक कॅल्शिअम असतं.

वजन कमी करण्यात मदत

फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजाने भरपूर असल्याने अंजीर डाएटमधील पोषण वाढवतं आणि वजन कमी करण्यात मदत करतं.

चरबी घटवण्यात मदत

रोज सकाळी पाण्यात भिजवलेले अंजीर खाल्ल्याने तुमचं मेटाबॉलिजम सुधारतं. ज्यामुळे शरिरावरील अतिरिक्त चरबी घटवण्यात मदत होते.

चमकदार त्वचा

अंजीमधील पोषणतत्वं अँटी-एंजिग म्हणूनही काम करतात, ज्यामुळे तुमची त्वचा सुधारते. त्वचा आणखी चमकदार होते.

ही माहिती सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही उपचार, डाएट, औषधं यांचा अंमल करण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधा.

VIEW ALL

Read Next Story