तोफगोळ्याला अंतराळाच्या दिशेने सोडल्यास कोणता ग्रह नष्ट होऊ शकतो?

Jan 25,2025


केवळ एका तोफगोळ्यामुळे होत्याचं नव्हतं होतं. तोफगोळ्यामुळे होणारा नाश तर सर्वांनाच माहित आहे.


परंतु, तोफगोळ्याला अंतराळाच्या दिशेने सोडल्यास नेमका काय परिणाम होईल? तोफगोळ्यामुळे कोणता ग्रह नष्ट होऊ शकतो का? चला पाहूयात, यावरील वैज्ञानिकांचे मत


खरंतर, तोफगोळ्याला अंतराळाच्या दिशेने सोडणे हा जरी एक रोमांचक विचार वाटत असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या, एका तोफगोळ्यात कोणत्याही ग्रहाला नष्ट करण्याइतकी क्षमता नसते.


कारण, तोफगोळ्याचा वेग हा मर्यादित असतो. सामान्यत: तोफगोळ्याचा वेग हा काही हजार मीटर प्रति सेकंद इतका असतो.


अंतराळातील कोणत्याही ग्रहाला नष्ट करण्यासाठी त्या वस्तुचा वेग आणि त्याची ताकद ही जास्त असावी लागते. परंतु, तोफगोळ्यात ग्रहाला नष्ट करण्याइतपत ताकद नसते.


जमिनीपासून अंतराळात जाण्यासाठी कमीत कमी वेग हा 11.2 किमी प्रति सेकंद असावा लागतो.


अशातच, कोणत्याही ग्रहाला नष्ट करण्यासाठी या वेगापेक्षा कित्येक पट जास्त ताकद असायला हवी आणि अशी ताकद आणि वेग तोफगोळ्याकडे नसतो.


अंतराळ अगदी विशाल आहे. जर कोणता तोफगोळा अंतराळाच्या दिशेने सोडला गेला तर तो अनंत अंतरापर्यंत नक्कीच जाऊ शकतो. परंतु, तोफगोळ्याची कोणत्या ग्रहाशी टक्कर होणे हे अशक्य आहे.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story