33 लाख कोंटींची संपत्ती असणाऱ्या टाटा ग्रुपच्या नोएल टाटा ते JRD टाटांचे शिक्षण किती?

Jan 25,2025


टाटा कुटूंबाचा 33 लाख कोटींचा व्यवसाय देशातील सर्वात मोठा व्यवसाय असल्याचं सांगितलं जातं. 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी सुरू केलेली कंपनीची आज जागतिक पातळीवर ओळखली जाते.


जेआरडी टाटा यांचे वडील रतन दादाभाई टाटा हे मुंबईतील द कॅथेड्रल अ‍ॅंड जॉन कॉनन शाळेत शिकले. यानंतर त्यांनी एल्फिस्टन या कॉलेजमधून शिक्षण घेतले.


पद्म विभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या जेआरडी टाटा यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला. त्यांचे शिक्षण जॉन्सन डी सॅली स्कूल ते मुंबईतील द कॅथेड्रल अ‍ॅंड जॉन कॉनन स्कूलमधून शिक्षण झाले.


जमशेदजी टाटा यांना टाटा ग्रुपचे संस्थापक म्हटलं जातं. त्यांनी 1858 मध्ये एल्फिस्टन कॉलेजमधून ग्रॅज्यूएशन केले. जमशेदजी यांची मेहनत आणि काहीतरी वेगळं करुन दाखवण्याचा विचार हेच टाटा ग्रुपच्या यशामागचं मुख्य कारण आहे.


दोराबजी टाटा म्हणजे जमशेदजी टाटा यांची पुढची पिढी. दोराबजी यांनी मुंबईतील प्रोपायटरी हाय स्कूलमधून शिक्षण घेतले. यानंतर प्रायव्हेट ट्यूशनसाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी नंतर कँब्रिजच्या गोंविले अ‍ॅंड कॅयस कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. मुंबईतील सेंट झेव्हिअर कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्यूएशन पूर्ण केले.


जमशेदजी टाटाचे सगळ्यात लहान पुत्र रतनजी टाटा यांनी मुंबईतील सेंट झेव्हिअर कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांनी टाटा ग्रुपचा व्यवसाय सांभाळला आणि व्यसायाला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


रतन टाटा यांनी नवल टाटा यांना दत्तक घेतले होते. नवल टाटा यांनी मुंबई युनिवर्सिटीमधून इकॉनॉमिक्स मध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केले.


रतन टाटा हे 1990 ते 2012 पर्यंत टाटा ग्रुपचे चेअरमन होते. त्यांनी कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल आणि न्यूयॉर्क मधील रिवरडेल कंट्री स्कूल मधून शिक्षण घेतले.


नोएल टाटा हे रतन टाटाचे सावत्र भाऊ आहेत. नोएल टाटा ससेक्स युनिवर्सिटीमधून ग्रॅज्यूएशन केले आणि INSEAD मध्ये आंतरराष्ट्रीय एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम पूर्ण केला.

VIEW ALL

Read Next Story