आयसीसीने मेन्स टी 20 क्रिकेटच्या प्लेअर ऑफ द ईयर 2024 च्या नावाची घोषणा केली आहे
यंदा या अवॉर्डसाठी 4 खेळाडूंमध्ये चुरस होती. यात अर्शदीप सिंह (भारत), बाबर आजम (पाकिस्तान) , ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया) आणि सिंकदर रजा (झिम्बाब्वे) यांचा समावेश होता.
27 वर्षीय अर्शदीप सिंहने या सर्व स्टार खेळाडूंना मागे सोडत ICC मेन्स T20I क्रिकेटर ऑफ द ईयर होण्याचा मान पटकावला आहे.
अर्शदीप सिंहने यापूर्वी T20 फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली तसेच भारताला T20 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2024 मध्ये अर्शदीप सिंहने टीम इंडियासाठी 18 टी-20 सामने खेळले आणि एकूण 36 विकेट घेतल्या.
2024 मध्ये तो T20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.
अर्शदीप सिंहला आयसीसीच्या 2024 च्या T20I संघात स्थान मिळाले होते.
2024 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अर्शदीप सिंहने 17 विकेट्स घेतल्या होत्या.