बाप लेकीचं नातं असं असतं की तो आपल्या लेकीच्या आनंदासाठी काहीही करु शकतो. मुलीच्या प्रत्येक क्षणात तो तिच्यासोबत उभा असतो. अमेरिकेतील साराच्या शाळेत कार्यक्रम होता. त्यावेळी मुलीच्या शाळेतील कार्यक्रमासाठी आजारी वडिलांनी हजेरी लावली.

तो खूप अशक्त आणि आजारी दिसत होता. त्याच्या नाकात नळीदेखील होती. त्याची अवस्था पाहून उपस्थितीत सगळे हैराण झाले.

सारा केट हिने होमकमिंग यूएसए सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

माजी विद्यार्थींसाठी होमकमिंग सोहळ्या शाळेत आयोजित करण्यात आला होता.

साराच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे आणि तोही स्टेज 4 मध्ये आहे. त्यामुळे त्याची प्रकृती खूपच खालावली आहे.

पण मुलीच्या आनंदासाठी आणि तिच्या आयुष्यातील अनमोल क्षणात तिची साथ देण्यासाठी हा बाप सोहळ्याला पोहोचला.

हे फोटो इन्स्टाग्रामला शेअर करताना साराने सुंदर पोस्ट लिहिली आहे. हे माझ्यासाठी स्वप्नासारखं आहे.

हा माझ्यासाठी खूप सन्मान असलेला क्षण आहे. अशा विशेष आठवणीबद्दल साउथसाइड हायस्कूलचं आभार मानते.

बाप लेकीच्या या कहाणीने नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. साराचे वडील खूप बलवान आहे, अशी कंमेट एका यूजर्सने केली आहे.

VIEW ALL

Read Next Story