9 कोटींचा स्वेटर पाहिलात काय?

काही दिवसांनी स्वेटरची मागणी झपाट्याने वाढणार आहे. पण तुम्ही कधी 9 कोटी रुपयांचा स्वेटर पाहिला आहे का?

9 कोटींना विकला गेलाय जुना स्वेटर

नुकताच एका लाल स्वेटरचा लिलाव झाला ज्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. एकीकडे हा स्वेटर जुना आहे, दुसरीकडे तो अगदी सामान्य स्वेटरसारखा दिसतो, मग त्याची किंमत एवढी का?

कोणाचा होता स्वेटर?

हा स्वेटर ब्रिटनच्या माजी राजकुमारी डायना यांचा आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची पत्नी आणि प्रिन्स हॅरी आणि विल्यम यांची आई लेडी डायना यांच्या या स्वेटरचा 9 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला आहे.

दोन आठवडे सुरु होती बोली

या स्वेटरसाठी दोन आठवडे लोक बोली लावत होते. लिलाव करणार्‍या कंपनीने त्याची किंमत 41 लाख ते 66 लाख रुपये इतकी ठरवली होती, परंतु बोलीमध्ये किंमत वाढतच गेली.

एवढ्या चर्चेत का आला हा स्वेटर?

जून 1981 मध्ये, चार्ल्सशी डायना यांच्या लग्नाच्या काही दिवसांनंतर त्या पोलो सामन्यात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घातलेल्या स्वेटरसोबतचा फोटो स्टाईट स्टेटमेंट बनला होता.

कार अपघातात मृत्यू

डायना यांनी 1996 मध्ये चार्ल्स यांच्याशी घटस्फोट घेतला आणि 1997 मध्ये जेव्हा त्या फक्त 36 वर्षांची होत्या, तेव्हा पॅरिसमध्ये कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.

मोडले लिलावाचे सर्व विक्रम

या विक्रीने स्वेटरच्या लिलावाचा सध्याचा विक्रमही मोडला आहे. यापूर्वी 2019 मध्ये, कर्ट कोबेनच्या ग्रीन कार्डिगनसाठी 334,000 अमेरिकन डॉलर दिले होते. (सर्व फोटो - सोशल मीडियावरुन साभार)

VIEW ALL

Read Next Story