पहिल्यांदा हरितालिकेचे व्रत करताय? आधी व्रताचे 'हे' नियम जाणून घ्या.

Sep 16,2023


हिंदू धर्मात हरितालिकेच्या व्रताला फार महत्व आहे. भगवान शंकर आणि माता पार्वतीला हे व्रत समर्पित आहे.


भगवान शंकर पतीच्या स्वरुपात प्राप्त व्हावे म्हणून देवी पार्वतीने हरितालिकेचे व्रत केले होते. या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न होत त्यांनी देवी पार्वतीला दर्शन दिले. यानंतर भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला.


देवी पार्वतीने त्याग, संयम, धैर्य आणि पवित्रतेने हे व्रत केल्याने त्यांची मनोकामना पुर्ण झाली, अशी या व्रताची कथा आहे.


भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित हरितालिका व्रत कुमारिका आणि विवाहित महिला करतात.


व्रत करताना मनाशी एक संकल्प करावा. मात्र तो संकल्प तुम्हाला आयुष्यभर पळावा लागेल.


पाणी आणि फळांशिवाय व्रत करण्याचा संकल्प केला असल्यास तो पूर्ण करावा.


व्रताच्या दिवशी मासिक पाळी आल्यास हरतालिकेची कथा दुरूनच ऐकावी. देवला स्पर्श करू नये मात्र उपवास जरूर करावा.


हरितालिकेचा उपवास मध्येच सोडता येत नाही, तो आयुष्यभर करावा लागतो. हरितालिकेचा उपवास मध्येच सोडता येत नाही, तो आयुष्यभर करावा लागतो.


हे व्रत करणाऱ्या महिलांना दुपारी किंवा रात्री झोपण्यास मनाई आहे.


पूजा करताना शृंगार करून पूजा करावी त्यामुळे शिव-पार्वती प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात.


व्रताचे उद्यापन करण्यापूर्वी आंघोळ करून विधीनुसार शिव पार्वतीची पूजा करावी.


व्रत सोडल्यानंतर पूजेचे साहित्य, मातीचे शिवलिंग, देवीची मूर्ती यांचे विसर्जन करावे.

VIEW ALL

Read Next Story