गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे का असते अशुभ?


गणेश चतुर्थीच्या दिवशी अशी अनेक कामे असतात जी तुम्ही चुकूनही करायची नसतात.


गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे अशुभ मानले जाते. पण असे का?


गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षात साजरी केली जाते. या दिवशी चुकूनही चंद्र पाहू नका.


जो कोणी यादिवशी चंद्र पाहतो त्याच्यावर खोटे आरोप लागतात, असे पुराणात म्हटले आहे.


कोणतेही शुभ काम करण्याआधी गणेशाचे नाव घेतले जाते. त्यांना अनेक नावांनी ओळखले जाते.


गणेशाला जेव्हा गजाचे मस्तक लावण्यात आले तेव्हा सर्वांनी त्याचे कौतुक केले.


चंद्राला आपल्या रुपावर गर्व होता. म्हणून तो जोरजोराने हसू लागला. यानंतर श्रीगणेशाने त्याला काळे होण्याचा शाप दिला.


चंद्राला आपल्या चुकीची जाणिव झाली आणि त्याने गणेशाकडे माफी मागितली.


ही घटना लक्षात राहण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणाऱ्यांवर खोटा कलंक लागतो असे म्हणतात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story