सुसंस्कृतपणासाठी स्टेटमेंट नेकलेस आणि स्टड जोडा. कॉटन साडीसह दिवसभर आरामदायी आणि मनमोहक राहा
गौरी गणपतीच्या स्वागताला तुम्ही केशरी लेहेंगा आणि एम्ब्रॉयडरी चे ब्लॉऊज हि स्टाईल करू शकता, शिवाय चोकर नेकलेस आणि साध्या ब्रेसलेटसह लुक वाढवू शकता.
जर तुम्हाला पारंपारिक पद्धतीने साडी नेसायला आवडत असेल, तर हा लुक नक्की ट्राय करा. हिरवी सिल्क साडी हा एक उत्तम पर्याय आहे. या समृद्ध रंगाची जोड घालून राणी गुलाबी रंगाच्या ब्लाउजसोबत, केसांच्या अंबाड्यावर मोगऱ्याच्या फुलांनी सुंदर लूक पूर्ण करा.
कांजीवरम साडी या प्रसंगासाठी एक आदर्श निवड आहे, नेहमीप्रमाणे तेजस्वी कसे दिसावे यासाठी तुम्ही कांजीवरमच्या डिजाईनची साडी नेसू शकता.
टील आणि ऑरेंज सिल्क साडीने अगदी महाराष्ट्रीयन लुकमध्ये शृंगार करून, पारंपारिक महाराष्ट्रीयन नथीसोबत लुक अगदी उठून दिसेल. दागिन्यांसाठी पारंपारिक डिझाईन्सचा वापर करून लुक पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रीयन चंद्रकोर टिकली लावून पाहा.
पैठणी साड्या महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी अभिमान असतो. उत्तम दर्जाच्या पैठणी साड्या हा नेहमीच चांगला पर्याय असतो जो सणासुदीच्या आणि राजेशाही थाटांसाठी उत्तम काम करतो.
नाजूक सोन्याची भरतकाम असलेली एक भव्य हिरवी साडी या सणाला तुमचा वेगळा लुक तयार करण्यास मदत करेल, शिवाय दागिन्यांसोबत सुंदर जोडणी करा.