या पुस्तकाचे लेखक म्हणाले होते की, 'माझ्या वाचकांना मी सांगितले होते, तुम्हाला माझ्या संपूर्ण कामाबद्दल वाचण्यासाठी संपूर्ण आयुष्य द्यावं लागेल. (सर्व फोटो - freepik.com)

हे लेखक म्हणजे आयर्लंडचे जेम्स जॉयस होते. त्यांनी लिहिलेले पुस्तक 628 पानांचे आहे. तेव्हा त्यांच्या बोलण्यावर कुणाचाच विश्वास नव्हता.

इतरवेळी लोक यापेक्षा जास्त पानांची पुस्तके काही दिवसात वाचून पूर्ण करतात. पण काही लोकांनी जेम्स जॉयस जे बोलले ते खरे असल्याचे सिद्ध केले.

Finnegan's Wake नावाचे हे पुस्तक गेल्या 28 वर्षांपासून एक ग्रुप वाचत आहे. 28 वर्षांपासून कादंबरीचे वाचन सुरु आहे.

आम्ही नुकतेच शेवटच्या पानांपर्यंत पोहोचलो आहोत, असे Finnegan's Wake वाचणाऱ्या ग्रुपने म्हटलं आहे. पण वाचकांना एवढा वेळ का लागतोय याचे उत्तर अनेकजण शोधतायत.

हे पुस्तक पहिल्यांदा पॅरिसमध्ये 2 फेब्रुवारी 1939 रोजी प्रकाशित झाले होते. दर महिन्याला ही कादंबरी वाचायला 10-30 जणांचा बुक क्लब वाचनालयात येत असे.

क्लबमधील लोकांना दोन पाने वाचायला महिनाभर लागला होता. त्यानंतर क्लबमधील लोकांनी आता झूम मिटींगद्वारे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली होती. ऑक्टोबरमध्ये हे लोक शेवटच्या पानावर पोहोचले होते.

इथपर्यंत पोहोचण्यासाठी या बुक क्लबला 28 वर्षे लागली. कॅलिफोर्निया, अमेरिकेतील या गटाला कादंबरी समजून घेण्यास अधिक वेळ घालवला. 80 भाषांचा संदर्भ देत पुस्तकात असे शब्द, वाक्य आणि चिन्हे लिहिली गेली आहेत, जी लोकांना समजायला खूप वेळ लागतो.

VIEW ALL

Read Next Story