येथे मिळतं सर्वात स्वस्त पेट्रोल; फक्त 2 रुपयांत टाकी होते फूल

पेट्रोल-डिझेलच्या दराचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होत असतो.

भारतात मुंबईपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल-डिझेलचा दर 100 पर्यंत आहे.

पण आपल्या आजुबाजूच्या देशांमध्ये इंधनाचा दर इतका कमी आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सर्वात स्वस्त इंधनदर असणाऱ्या देशांच्या यादीत इराण पहिल्या स्थानी आहे. येथे पेट्रोल फक्त 2.42 रुपये प्रती लीटर आहे.

टॉप 3 देशात पुढील नाव लिबियाचं आहे. येथे एक लीटर पेट्रोलचा दर 2.58 रुपये प्रती लीटर आहे.

तिसरा देश वेनेजुएला आहे. येथे पेट्रोलचा दर 2.92 रुपये प्रती लीटर आहे.

दरम्यान जर महाग पेट्रोल दरांच्या यादीत हाँगकाँग पहिल्या क्रमांकावर आहे. येथे पेट्रोल 259 रुपये प्रती लीटर आहे.

भारतात पेट्रोलचा दर 104 रुपये प्रती लीटर आहे. दिल्लीसह काही राज्यात पेट्रोलचा दर 100 पेक्षा कमी आहे.

VIEW ALL

Read Next Story