शुबिल हा पूर्व-ऐतिहासिक मानवी आकाराचा आफ्रिकन पक्षी आहे जो 5 फूट उंच वाढू शकतो.
शुबिल ज्याला व्हेल हेडेड स्टॉर्क म्हणून देखील ओळखले जाते. जगातील सर्वात लांब चोच असलेल्या पक्षांमध्ये तिसरा क्रमांकवर आहे.
हा अविश्वसनीय पक्षी ग्रहावरील सर्वात विचित्र पक्ष्यांपैकी एक आहे. शुबिल हा जगातील सर्वात भयानक पक्षी असल्याचे म्हटले जाते.
शुबिलचे महाकाय बिल, लांब चोच आणि हाडकुळे पाय यामुळे शिकार करण्यासाठी मदत होते.शुबिल हा अनेक तास एकाच जागी हालचाल न करता उभा राहू शकतो.
शुबिल लंगफिश, ईल आणि साप यांसारख्या प्राण्यांची शिकार करतात. ते मगरीची पिल्लं आणि सरडे खातात.
जर्नल ऑफ आफ्रिकन ऑर्निथॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले की, कॅटफिश हे त्याचे सामान्य शिकार आहे जे सुमारे 71% त्याचे जेवण आहे.
शुबिलचा बुध्यांक नकारात्मक असल्याने त्याला ' स्टूपिड बर्ड' म्हणून देखील ओळखतात. शुबिलची निर्णय क्षमता कमी असल्याने त्याच्यासमोर अन्न ठेवले तर खावे की नाही याचा विचार तासनसात करत राहतात.
इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या मते जगभरात केवळ 3,300 ते 5,300 एवढीच शुबिलची लोकसंख्या शिल्लक आहे.