सध्या पावसाळा सुरू असल्याने सुर्याचे दर्शन आपल्याला होत नाही तर काही वेळेस ऑफिसमध्ये असल्याने सुर्यप्रकाश घेता येत नाही.
पण तुम्हाला माहित आहे का रोज फक्त दहा मिनिटे सुर्यप्रकाश घेतल्याने तुम्ही दीर्घायुषी होऊ शकता.
एका अहवालानुसार, जे लोक धुम्रपान करत नाहीत आणि उन्हात बाहेर जात नाहीत त्यांचे वय धुम्रपान करणाऱ्या आणि उन्हात बाहेर जाणाऱ्यांसारखेच आहे.
संशोधननुसार धुम्रपानाप्रमाणेच सुर्यप्रकाश टाळणे देखील तुमचे आयुष्य कमी करू शकते.
या संशोधनानुसार सुर्यप्रकाशाच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या लोकांपेक्षा सुर्यप्रकाश टाळणाऱ्याचे आयुर्मान 6 महिने ते 2.1 वर्ष असल्याचे दिसून आले.
सुर्यप्रकाशात बसल्याने मूड चांगला राहतो त्याचबरोबर एकटेपा दूर होण्यास मदत होते.
जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर सुर्यप्रकाशात बसल्याने या समस्यांपासून दूर राहता येते.
सूर्यप्रकाशामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी3 मिळते. जे आपल्या मूड रेग्युलेशनमध्ये महत्वाची भूमिका बजावते.
सुर्यप्रकाशामुळे ताण कमी होण्यास मदत होते आणि आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.