Apple चे सीईओ, टीम कुक यांनीच याबाबतचा खुलासा केला. BBC Podcast 'Dua Lipa- At Your Service' मध्ये त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या.
एकदोन नव्हे, तब्बल 4,08,36,57,550 रुपये पगार घेणाऱ्या टीम कुक यांची जागा कोण घेणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
मात्र, अॅपलकडून भविष्याच्या दृष्टीनं काही निर्णय घेण्याविषयी, पुढं काय होईल याचा कोणताच बेत नसल्याचं ते म्हणाले.
तुमच्या जागी कोणाची नियुक्ती होईल असा प्रश्न विचारला असता, कुक यांनी लक्षवेधी उत्तर दिलं.
सध्या आपण अशा अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरील या पदासाठी तयार करत आहोत, असं ते म्हणाले.
अॅपलचा नवा सीईओ हा कंपनीमधीलच एखादा कर्मचारी असावा, ज्या व्यक्तीला कंपनीच्या कार्यपद्धतीची कल्पना असेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
अॅपलशिवाय आपण आपल्या जीवनाचा विचारही करु शकत नाही, अशा शब्दांत कुक यांनी कंपनीवरील आपलं प्रेम आणि एकनिष्ठा व्यक्त केली.