पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव करणाऱ्या युएसएने इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये युएसएने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता.
रोमांचक अशा सामन्याचा हिरो ठरला मराठमोळा सौरभ नेत्रावळकर... अखेरच्या ओव्हरमध्ये सौरभ नेत्रावळकरने 18 धावा रोखल्या अन् सामना जिंकवून दिला.
पण तुम्हाला माहितीये का? सौरभ नेत्रावळकरची नेटवर्थ कितीये? अमेरिकेत स्थलांतरित झालेला सौरभ नेत्रावळकर किती कमावतो?
सौरभ नेत्रावळकरची एकूण संपत्ती अंदाजे 1 ते 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये 16 कोटी 68 कोटी असण्याची शक्यता आहे.
सौरभचं करिअरचे उत्पन्न, जाहिराती, करार आणि गुंतवणूक यांचा विचार करता त्याची नेटवर्थ कोटींच्या घरात आहे.
सौरभ नेत्रावळकरचा नेमका पगार माहीत नसला तरी USA मध्ये क्रिकेटमध्ये किमान वेतन 15,080 युएस डॉलर असतं. तर सरासरी वेतन 70,000 युएस डॉलर आहे.
युएसएच्या संघाचं कमाल वेतन 90,000 डॉलर प्रतिवर्ष इतकं असतं. तर दुसरीकडे तो अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनीत देखील काम करतोय.