Chanakya Niti: भल्या माणसाचाही सर्वनाश करतात 'या' 5 सवयी

चाणक्यांनी आयुष्यातील चांगल्या आणि वाईट सवयींविषयी सांगितलं आहे. चला जाणूया कोणत्या सवयी व्यक्तीचा सर्वनाश करू शकतात.

व्यक्तीच्या सवयींचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर पडत असतो. चांगल्या सवयी चांगले तर वाईट सवयी वाईट परिणाम घडवतात.

काही सवयी व्यक्तीच्या सर्वनाशाचे कारण बनू शकतात. अशा सवयी टाळल्या पाहिजेत आणि चांगल्या सवयी अंगीकारील्या पाहिजेत

खूप वेळ झोपणं

बऱ्याच व्यक्ती सकाळी उशिरापर्यंत झोपतात. अशा व्यक्तींकडे पैसा टिकत नाही आणि त्यांना कालांतराने गरिबीचा सामना करावा लागतो.

साफ- सफाई न करणं

ज्या घरी साफ सफाई नसते तिथे लक्ष्मी वास करत नाही. परिणामी अस्वच्छता ठेवणाऱ्यांस कालांतराने गरिबीचा सामना करावा लागतो.

अपमानजनक वक्तव्य

जी व्यक्ती इतरांचा अनादर करते तिला आयुष्यभर धनाची कमतरता भासते अशा व्यक्तींपासून लक्ष्मी कोपीत राहते.

वाममार्गाने पैसाप्राप्ती

आचार्य चाणक्यांच्या मते ज्या व्यक्ती चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात त्यांच्याकडे पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यांना सतत मनस्ताप आणि अडचणींना सामोरं जावं लागतं.

अकार्यक्षम राहणं

ज्या व्यक्ती कोणतंही काम करताना आळशीपणा करतात अशा व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत उलट यांची अधोगती होत असते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story